Share

संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचं कळतं. जर रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. वेळीच लॉकडाऊन केलं नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाउन दरम्यान कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं न केल्यास संसर्ग वाढत जाईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. कोरोनाबाधितांचं आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे. काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा करतील. ज्यांचं हातावर पोट आहे त्याच्यांसाठी काहीतरी करावं लागेल. अस देखील थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!