Share

सरकार कुठपर्यंत पोहोचणार, त्यांना दोष देऊन उपयोग नाही : नाना पाटेकर

Published On: 

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नाम फाऊंडेशन व सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावासह लॉकडाऊन आणि त्यामुळे होणाऱ्या प्रभावावर भाष्य केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला फक्त राज्य सरकारला जबाबदार धरता येणार नाही असं भाष्य नाना पाटेकर यांनी केलं आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना दोन वेळचे खाणे देखील मुश्किल झाले असून समाजातील सामर्थ्यवान लोकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या जेवणाची तरी सोय करायला हवी. सरकारला मर्यादा असतात, सरकार तरी कुठं पर्यंत पोहोचणार. तसेच, वाढत्या कोरोना संसर्गाची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. नियमांचे पालन न झाल्याने हा रोग पुन्हा वाढला आहे. त्यामुळे फक्त सरकारला दोष देऊन चालणार नाही, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!