मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ ८ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका नगरसेवकांना कार्यकाळाची मुदतवाढ देणार की, पुढील कालावधीसाठी प्रशासन नियुक्त करणार, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होत असल्या तरी लोकसंख्यावढीमुळे प्रभागांची संख्या ९ ने वाढविण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांच्या कामाची परिणामकारक दखल घेण्यासाठी ही नवीन प्रभागरचना केली असल्याचे सांगितले जाते. मुंबई शहर विभागात ३, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ३ असे एकूण ९ प्रभाग वाढविण्यात आले आहेत. ९ वाढीव प्रभागांसह पालिका १ फेब्रुवारीला प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी दिला गेला आहे.
राखीव जागांबाबत महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला आहे. २०२२ मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महिलांना ११८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात एससीसाठी ८, एसटीसाठी १ आणि इतर १०९ जागा साधारण गटातील महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तूर्तास ओबीसींना खुल्या प्रवर्गात समावेश दिला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या:
नितीन गडकरींनी केले पुत्रशोक आमदाराचे सात्वन; गडकरींसमोर ते ढसाढसा रडले
- “…मग आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- “…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण यांना ‘गोडसे-आपटे भारतरत्न’ पुरस्कार; हिंदू महासभेनं केलं सन्मानित!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

