औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३४ लाख ३८ हजार ५०० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून २७ लाख ९७ हजार ५४१ जणांनी पाहिला तर पंधरा लाख २१ हजार ६५८ आणि दुसरा डोस घेतला आहे. जिल्हा लवकरच पूर्णपणे लसीकरणयुक्त होण्याच्या वाटेवर आहे. गंभीर होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण यामुळे कमी आहे. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने अवलंबलेल्या विविध मार्गांमुळे औरंगाबाद जिल्हा लसीकरणयुक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
कोरानाच्या पहिल्या दोन लाटेत औरंगाबादेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मृत्यू होणाऱ्यांची संख्याही या काळात अधिक होती. कोरोनाचा धोका टळलेला नव्हता या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी प्रशासनासोबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ५०० रुपये दंड, शासकीय कार्यालयात प्रवेश नाही, लस घेतलेली नसेल तर नो पेट्रोल, नो रेशन, नो गॅस तसेच वेतन आणि पेन्शनही मिळणार नाही. रिक्षा बंदी, प्रवासांवर बंधने आली. सुरुवातीला औरंगाबादकरांनी यास चांगलाच विरोध केला. मात्र सक्ती असल्यामुळे लस घेणे प्रत्येकाला क्रमप्राप्त होते. त्यामुळे या निर्णयाचा फायदा झाल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची टक्केवारी ८० टक्क्यांपर्यंत आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढल्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णांचे प्रमाणही कमी होतांना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आ. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांना शरण; राणेंवर अटकेची टांगती तलवार
- “सलमान हा अफझल खान तर मी छ.शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस… कोथळा बाहेर काढेन”
- माझा चेहरा शेवटचा बघा, असे वडिलांना म्हणत नवोदित मॉडेल्सची सहाव्या मजल्यावरुन उडी
- “अमृता फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये”, मनीषा कायंदेंची टीका
- औंरगाबादेत बॅनर लावून बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

