मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती, असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं होतं आणि याच टीकेमुळे पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आशिष शेलार यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला. हे सगळं घडल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेलं पत्रं त्यांच्या जुन्या घरच्या पत्त्यावर आले होते मात्र ते त्यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. इतर अनेक पत्र येत असतात त्यात हे पत्र देखील होतं. पत्रातील भाषा अत्यंत अश्लील होती, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख त्यात करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे आणि बाहेर वेगळं नाव आहे तसेच हे पत्र पनवेल पोस्ट वरुन आले असल्याचे समजते.
मा. महापौर व महिलांचा अवमान केल्याची तक्रार महिला आयोग, पोलिसांकडे जे करीत आहेत, त्यांनी पत्रकार परिषद एकदा निट पुर्ण ऐकावी. मी जे बोललोच नाही, ते महापौरांशी जोडून हेच महापौरांचा अवमान करीत आहेत. जाणीवपूर्वक सत्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर मलाही कायदेशीर मार्ग पत्करावा लागेल. https://t.co/MbMMxeMXAO
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 7, 2021
महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या पत्रात अत्यंत अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता त्याच सोबत महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- संपूर्ण देश बिपिन रावत यांच्या निधनाने शोक व्यक्त करतंय, मात्र गुणरत्न सदावर्ते विचारतात…
- भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी
- …म्हणून आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला; रोहितचे मोठे वक्तव्य
- कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत
- ‘युपीत रामराज्य प्रस्थपित झाले, अभिनंदन योगीजी!’


