Share

‘त्या प्रकरणी २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित केलं’

Published On: 

मुंबई: वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. या घटनेत चार जण होरपळले. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून भाजप नेते आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

वरळीतल्या घटनेनंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तसेच महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर टीका केली. अशा काळात महापौर कुठे निजल्या अशी टीका शेलारांनी केली. त्याला पेडणेकर यांनी प्रत्त्युत्तर दिलंय. अशाप्रकारचं वक्तव्य हा महिलांचा अवमान आहे. आपण कोणाविषयी बोलतो आहोत, याचं भान त्यांना राहिलेलं नाही. त्याच सोबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना निलंबित केले असल्याची देखील माहिती दिली आहे.

दुर्घटनेबद्दल बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, घटना घडली त्यावेळी शिवसैनिक तातडीनं घटनास्थळी पोहोचले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात आलं. पोद्दारला उपचार होणं शक्य नव्हतं. अॅम्ब्युलन्स खरंतर कस्तुरबालाच येणं आवश्यक होतं, मात्र नायरला अॅम्ब्युलन्स गेली. तेथे काही प्रमाणात उपचाराला उशीर झाला. असंवेदनशीलता दिसली, त्यामुळे २ डॉक्टर आणि एका नर्सला तातडीनं निलंबित केलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!