Share

‘भाजपनं दोन हजार लोकांवर करोडो रुपये खर्च केले’

Published On: 

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर (Chhotu Bhoyar) हे गायब आहेत अशा बातम्या पासरवण्यात आल्या होत्या, मात्र भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक निवडणुका व इतर अनेक विषयांवर भोयर यांनी भाष्य केलं आहे. त्याच सोबत ज्या लोकांच्या संपर्कात असायला पाहिजे त्यांच्या संपर्कात असल्याचे देखील भोयर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी बोलताना भोयर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा उमेदवार म्हणून आणि कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून मी निश्चितपणे जिंकल्यात जमा आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्या लोकांशी संपर्क करायला हवा त्यांच्या संपर्कात मी आहे. मात्र मी गायब असल्याच्या खोट्या बातम्या पासरवण्यात आल्या होत्या. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे, असं देखील भोयर म्हणाले आहेत.

मी निवडणूक लढवणार हे जेव्हा विरोधकांच्या लक्षात आलं तेव्हा विरोधकांनी त्यांची राजकीय स्ट्रॅटजी बदलली आहे. विरोधकांनी म्हणजेच भाजपने ही निवडणूक कशी लढवायची हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपने १५ दिवस दोन हजार लोकांच्यावर करोडो रुपये खर्च केले असल्याचा देखील आरोप यावेळी भोयर यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!