मुंबई : काही दिवसांपूर्वी वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. या घटनेत चार जण होरपळले. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगेश पुरी या चार महिन्याच्या बालकाचा १ डिसें. रोजी मृत्यू झाला. त्यानंतर आनंद पुरी यांचा ४ डिसें. तर विद्या पुरी यांचा काल मृत्यू झाला होता. तसेच या दुर्घटनेत एक पाच वर्षाचा मुलगा १५ ते २० टक्के होरपळला आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर तसेच महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्यावर टीका करत अशा काळात महापौर कुठे निजल्या, असे वक्तव्य केले होते.
तद्पश्चात आशिष शेलार यांच्या टीकेवर पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या आहेत की,’आशिष शेलार भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना त्यांच्यात पक्षात काही स्थान उरले नाही. मी निजले असे म्हणताय तर कोविडकाळात तुम्ही काय अंगाई गात होतात का?’, असा सवाल त्यांनी केला. तसेच पुढे त्या म्हणाल्या की,’उत्तर प्रदेशात ६० मुलं ऑक्सिजनविना गेली, तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या. अशाप्रकारचे वक्तव्य हा महिलांचा अवमान आहे. आपण कोणाविषयी बोलतो आहोत, याचे भान त्यांना राहिलेले नाही.
दरम्यान, घटना घडली त्यावेळी शिवसैनिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात आले. पोद्दारला उपचार होणं शक्य नव्हतं. अॅम्ब्युलन्स खरंतर कस्तुरबालाच येणे आवश्यक होते, मात्र नायरला अॅम्ब्युलन्स गेली. तेथे काही प्रमाणात उपचाराला उशीर झाला. असंवेदनशीलता दिसली, त्यामुळे २ डॉक्टर आणि एका नर्सला तातडीने निलंबित करण्यात आले, असेही यावेळी पेडणेकरांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या १० वर
- …तरी केंद्रातील विद्यमान सत्ताधारी जीएसटीच्या प्रेमात आकंठ बुडालेत- संजय राऊत
- शिवेंद्रराजे भोसलेंना शशिकांत शिंदेंचा खोचक टोला; म्हणाले,’माझी शिफारस नसल्यामुळे…’
- …तर ओमायक्रॉनचा एक रुग्ण १५-२० जणांना बाधित करु शकतो- डॉ.अमित द्रविड
- ‘केंद्र सरकारने आरक्षणाचे प्रस्ताव सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

