Share

सुर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्कार न मिळाल्याने झहिर नाराज म्हणाला,’हा तर अन्याय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताकडून सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर सामनावीर ठरलेल्या भुवनेश्वर कुमारने २२ धावात ४ गडी बाद केले होते. मात्र सामनाविराचा खरा मानकरी हा सुर्यकुमार यादव हा होता असे वक्तव्य भारताचा माजी गोलंदाज झहिर खानने म्हणले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे. यावेळी झहीर म्हणाला, ‘ज्या खेळपट्टीवर सामना झाला ती खेळपट्टी ही फलंदाजीसाठी सोपी नव्हती. त्यामुळे सुर्यकुमार यादव हा खरा सामनावीराचा मानकरी होता.’

या डावात सुर्यकुमारने सर्वात कमी डॉट चेंडु खेळला असेही झहिर खान यावेळी म्हणला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३८ धावांनी मात केली. यापुर्वी श्रीलंकेविरुद्धच्या झालेल्या एकदिवसीय मालिकेत सुर्यकुमार यादवने पदार्पण केले होते. पहिलीच एकदिवसीय मालिका खेळणाऱ्या सुर्यकुमार यादवने मालिकावीराचा मान पटकावला. आता त्याची निवड इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!