चिपळूण : सध्या शिवसेना आमदार भास्कर जाधव चर्चेत आहे. तसेच विरोधक त्यांच्या वक्तव्या मुळे त्यांच्यावर टीका करत आहे. ज्या महिलेला त्यांनी ते उद्धट वक्तव्य केले होते. त्या महिलेने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणल्या, ‘अजूनही आमच्याकडे लाईट नाही, मोबाइल चार्ज नाही त्यामुळे सोशल मीडियावर नेमका काय प्रचार सुरु आहे हे मी पाहिलेलं नाही. पण ते उद्धटपणे बोलले नाहीत. वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत’ असे त्या म्हणाल्या.
तसेच ‘त्यांचा आवाजच रावडी राठोडसारखा असल्याने गैरसमज होता. त्यांचं बोलणं कठोर आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात,’ असेही त्या महिलेने सांगितले. दरम्यान, माझ्यावर कोणताही दबाव नाही. दबाव असता तर आमदार, खासदारांचा पगार काढला नसता. त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही, असंही त्या महिलेने म्हटलं आहे.
या विषयावर जाधव यांनी देखील वक्तव्य केले आहे. त्यांनी त्या महिलेला मी मुली सारखे माणत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. तसेच त्या मुलाला आपला नातू किंवा भाचा मानून त्याच्या आईला सांभाळायला सांगितले होते. असे जाधव सांगतात.
महत्त्चाच्या बातम्या
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

