Share

लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली

Published On: 

🕒 1 min read

पुणे – संपूर्ण जगात आज रोजी कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले आहे. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या हा दुष्ट विषाणु मुळे आपला भारत देश पण प्रभावित झालेला आहे. सध्याच्या वातावरणामुळे सर्वाधिक परिणाम हा पर्यटन उद्योगावर झाला आहे. संचारबंदी मुळे सर्वच बाबतीत मर्यादा आल्या आहेत. तथापि, या काळामध्येही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी सतत काम करीत आहेत. स्वच्छता हीच सेवा आणि अतिथी देवो भव ही ब्रीद वाक्य उराशी बाळगुन संचारबंदी असली तरिही पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेवुन सुरु करण्यात आली आहेत. पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने आणि पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात यशस्वी झाली होती.

दरम्यान, सदरच्या लॉकडाऊन कालावधीत पर्यटक कमी असल्याने महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठीचे नियोजन केले आहे. महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरुण कर्मचारी यांचा मेळ साधत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची संकल्पना ही महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मा. आशुतोष सलील (भा.प्र.से.) यांची असुन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सदरच्या प्रशिक्षणाबाबत सर्वतोपरी महत्त्वाची भुमिका बजावली आहे. सदरचे प्रशिक्षण हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व उपमहाव्यवस्थापक मा. चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.. सदरच्या कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत Front Office Management, House Keeping आणि Food and Beverages याबाबतचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाअंतर्गत Attitude based Training आणि Pandamic Based Training सह प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. पर्यटकांना आनंदी ठेवणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, सव्त:ची स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकिकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचा समावेश सदरच्या प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. सदरचे प्रशिक्षण हे दोन आठवडयाचे असुन उपरोक्त विषयातील तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक याद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण 24 मे पासुन ऑनलाईन पध्दतीने सुरु झाली आहेत. या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. सदरच्या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असुन पर्यटकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी जावुन रहावे आणि सोबत कामही करावे असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे लॉक डाऊन नंतर पर्यटक मोठया प्रमाणावर पर्यटनास निघणार आहेत. आगामी काळात पर्यटकांना वेगवेगळया प्रकारे आकर्षित करुन पर्यटन व्यवसायास भरभराटी येणार आहे. त्यामुळे आगामी पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी कायमस्वरुपी करण्यात येत असुन पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदीक काढा, व्हिटयॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सर्वच पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखादया पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. “वर्क फ्रॉम नेचर” बरोबरच योगा आणि मेडीटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. पर्यटकांना कोरोना संचारबंदीनंतर महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. निसर्गाचे भान ठेवुन आणि कोरोना बाबत दक्षता घेवुन आगामी संचारबंदीनंतरच्या काळात बिनधास्त पर्यटन करता येणार आहे.”

आगामी काळात महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.maharashtratourism.gov.in या वेब साईटवर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक, दिपक हरणे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!