औरंगाबाद : शहरात १६ एप्रिलपासून लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी अँटिजेन तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांद्वारे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असलो तरीही गाफील राहून चालणार नाही, यासाठी आयुक्तांनी पुन्हा एकदा तपासणी पथकांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.२८) करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये ५०७ जणांची तपासणी करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
संचारबंदीचे शेवटचे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे यात दहा पथकांची वाढ करुन मनपा आणि पोलीस प्रशासन अधिक सक्तीने विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी करत आहे. मात्र लसीकरण, कडक निर्बंध, नागरीकांची स्वयंशिस्त यामुळे पॉझिटिव्हीटी रेट मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांच्या तपासणीतही बोटावर मोजण्या इतके नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी यासंदर्भात ट्विट करत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण येत होते. त्याचवेळी राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्णसंपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. कुठलेही योग्य कारण नसतांना अजूनही संचारबंदीत अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. यात आणखी पथके वाढवण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कुख्यात गुन्हेगाराची हत्या करणारे आणखी चार जण गजाआड
- शहरातील ‘या’ हॉटेलवर थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच करावी लागली कारवाई!
- तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा; कोल्हापूर प्रशासनाला मुश्रीफांनी दिला अलर्ट
- आईवडील गमावलेल्या मुलांना राज्य शासनाने तीन हजार मासिक वेतन द्यावे- आ.सतिश चव्हाण
- जाधवमंडीतून मोबाईल चोरणाऱ्यास पोलिस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

