औरंंगाबाद : व्यापा-याचे घर फोडून चोराने रोख आणि लॅपटॉप लांबवला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सिडको एन-२, ठाकरेनगरातील महालक्ष्मी चौकात घडला.
प्रमोद नारायण खरात (वय ४७) हे लॉकडाऊन असल्याने कुटुंबियांसह भोकरदन तालुक्यातील कोठी या मुळगावी गेले होते. २६ मे रोजी सकाळी शेजारी राहणा-या कृष्णा सोनवणे यांनी संपर्क साधत खरात यांना घरफोडी झाल्याचे सांगितले.
त्यावरुन खरात यांनी तात्काळ धाव घेत घराची पाहणी केली. तेव्हा दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले होते. तसेच त्यातील ३५ हजाराची रोकड, एलईडी आणि लॅपटॉप लांबवल्याचे समोर आले. त्यावरुन खरात यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार ए. एस. शिरसाठ करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

