जालना : शहरातील शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांनी निलंबित करण्यात आले आहे. जालना पोलीस अधिक्षक यांनी ही कारवाई केली आहे.
नुकतीच जालन्यातील एका खाजगी हाॅस्पीटलमध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. यावेळी पोलीसांनी तिथे धाव घेत गोंधळ घालणाऱ्यांना मारहाण करत गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते.
हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करणारे भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर नुकताच व्हायरल झाला होता.
नेमके काय आहे प्रकरण ?
शिवराज नारियलवाले जालना येथील दीपक हॉस्पिटलमध्ये बहिणीचे रिपोर्ट बघण्यासाठी गेले असता, त्यांच्याच समाजातील एका जिम चालकाचा सात एप्रिल रोजी अपघात झाला होता. त्याला देखील तिथेच भरती करण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये जिम चालकाचे मित्र तसेच नातेवाईकांची गर्दी वाढत असल्याने हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली. तसेच नगरसेवक देवावले यांच्याशी उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर हे अर्वाच्च भाषेत संभाषण करू लागले.
चुकीची भाषा शैलीचा वापर खिरडकर करत असल्यामुळे, नारीयलवाले यांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हि बाब खिरडकर यांच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास आली. त्यांनी हि माहिती खिरडकर यांना देताच त्यांनी नारीयलवाले यांचा मोबाईल हिसकावला आणि त्यांना नोंदणी कक्षाच्या शेजारी नेत सहकाऱ्यांसह मारहाण करण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या

