मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले परदेशी क्रिकेटपटू आपापल्या देशांत परतले आहेत.
दरम्यान कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताकडून येणाऱ्या उड्डाणावर बंदी घातली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवमध्ये काही दिवस राहावे लागले होते. आणि सरकारची परवानगी मिळेपर्यंत खेळाडूंना तिथेच कॉरंटाईन कालावधी घालवावा लागला. आता ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या घरी पोहचले आहेत. घरी पोहचल्यानंतर खेळाडू आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.
Doing a live Q&A at 7pm (in 10 mins time). Jump onto my YouTube channel to join in: https://t.co/evRrrwZTzW
— Pat Cummins (@patcummins30) May 26, 2021
मालदीव आणि सिडनीमध्ये क्वारंटाइन दरम्यानचा अनुभव ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कॉमिन्सननं आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स हाताची ताकद टिकवून ठेवण्यासाठी क्वारंटाइन आणि लॉकडाऊन दरम्यान टॉवेलचा उपयोग करून बॉलिंगचा सराव करत आहेत.
कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी महिनाभर क्रिकेट नसल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ या टप्प्यात तंदुरुस्त राहण्यासाठी टॉवेल्स वापरण्यासह नवीन मार्ग शोधत आहे. रूममध्ये बॉलने सराव करणं शक्य नाही त्यामुळे टॉवेलचा उपयोग करून खेळाडूंनी आपला सराव सुरू ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- महाराष्ट्र जिंकतोय ! राज्यात आज तब्बल ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

