सिल्लोड : कन्नड येथे महावितरणचे विभागीय कार्यालय होते. त्याअंतर्गत कन्नड, सोयगाव, सिल्लोड, वैजापूर हे तालुके होते. परंतु कन्नडचे विभाजन करण्यास मागील महिन्यात मान्यता मिळाली. आणि सिल्लोड येथे प्रत्यक्ष कामकाज करण्यास शनिवारी (दि.३) सुरुवात करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे उदघाटन प्रक्रियेला फाटा देत प्रत्यक्ष कार्यालय सुरु करण्यात आले.
विद्युत पुरविणाऱ्या महावितरणलाही ग्राहक सुरक्षित सेवेसाठी आपला कामकाज विस्तार वाढवावा लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहक गरज ओळखून महावितरणचे संजय आकोडे, अधिक्षक अभियंता ग्रामीण मंडळ महावितरण अभिजीत सिकनिस, कार्यकारी अभियंता सुरेश दौड, अतिरीक्त कार्यकारी अभियंता सचिन बनसोडे शाखा अभियंता व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू करण्यात आले.
सिल्लोड विभागात आता सिल्लोड ग्रामीण, सिल्लोड शहर, सोयगाव या रचनेत कामकाज सुरू झाल्याने विद्युत ग्राहक, अधिकारी, कर्मचारी आदींच्या कन्नड फेऱ्या बंद होऊन वेळ व पैसा वाचणार आहेत.
सिल्लोड विभागात दोन उपविभाग होऊन त्यात भराडी शाखा, आमठाना शाखा, सिल्लोड शहर शाखा, सिल्लोड ग्रामीण शाखा, आणवी शाखा, अजिंठा शाखा, गोळेगाव शाखा, शिवना शाखा तर सोयगाव उपविभाग मध्ये सोयगाव शाखा, बनोटी शाखा, फरदापुर शाखा, सावळदबारा शाखा असा समावेश आहेत. यात पहिल्यापेक्षा जास्त मनुष्यबळ वाढणार असल्याने कामे जलद होऊन सुरळीत होऊन विद्युत ग्राहकांना सेवा अधिक मिळेल.
रोहित्र जळल्यास या दोन्ही तालुक्यातील जनतेस कन्नड फेऱ्या माराव्या लागायच्या. लवकरच नवीन पद भरणा होऊन किंवा बदलीने नवीन अधिकारी कर्मचारी भरती होणार असल्याचे संजय आकोडे यांनी सांगितले. शिवाय लवकर नवीन इमारत उभारून आवश्यक त्या सुलभ सोईने कार्यलय कार्यन्वित होणार असल्याचे सिकनिस यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मन सुन्न करणारी घटना! अपघातात पती पत्नीच्या मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा
- ‘त्या’ घटनेची अतिरीक्त जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी होणार
- संसर्गाचे राजकारण रोखा ; मुख्यमंत्र्यांचे माध्यमांना आवाहन
- गाईड, रिक्त जागांच्या घोषणेनंतरच ‘पीएचडी’साठी नोंदणी
- कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी पालिकेने वाढवली चाचण्यांची संख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

