मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनला पर्याय सूचवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार त्यांनी आज वृत्तपत्र संपादक, मालकांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान काही पर्याय सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाऊन कुणालाही हवाहवासा वाटत नाही. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही लढाई तुम्ही आम्ही मिळून लढावी लागेल असं नमूद केल आहे.
आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने हि साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो.
मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको.
आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊत या दृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा व वस्तुस्थिती मांडावी हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- गाईड, रिक्त जागांच्या घोषणेनंतरच ‘पीएचडी’साठी नोंदणी
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

