परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सारी वार्डात शनिवारी पहाटे घडलेल्या प्रकाराची अतिरीक्त जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि.तीन) दिली.
शासकीय रुग्णालयातील सारी वार्डातील रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी शनिवारी (दि.तीन) भल्या पहाटे प्रचंड गोंधळ घातला. कर्मचार्यांना मारहाणीचा प्रयत्न केला. नातेवाईकांचा रौद्रावतार पाहून सारी वार्डातील सर्व कर्मचार्यांनी तेथून पळ काढला. तसेच तेथे एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचा पारा चांगलाच चढला होता. मात्र, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके हे दाखल झाले.नातेवाईकांची समजूत काढली. त्यापूर्वी नानलपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी – कर्मचारी दाखल झाले होते.
शासकीय रुग्णालयातील अधिकारी – कर्मचार्रांची बैठक घेवून शनिवारी रात्री झालेल्या संपूर्ण घटनेची माहितीजिल्हाधिकारी यांनी घेतली. त्यानंतर या पूर्ण घटनेची चौकशी अतिरीक्त जिल्हाधिकार्यांमार्फत केली जाईल. दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असेही या वेळी ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे ?
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

