Share

कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी पालिकेने वाढवली चाचण्यांची संख्या

Published On: 

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाची वाढत चाललेली साखळी खंडीत करण्यासाठी आता महापालिकेने रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. यासाठी रोज दहा हजार चाचण्या करण्याचे टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे. आगामी काळात चाचण्याची ही जम्बो मोहीम राबवण्यासाठी अडिच लाख अँटिजेन किटची पालिकेने खरेदी केली आहे. आरटीपीसीआर चाचणीच्या एक लाख किटस् पालिकेकडे आहेत.

औरंगाबाद शहरात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. यामुळे शहरात कोरोनाचा नवीन स्टे्रन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग अधिक गतीने परसत असल्याने त्यास नियंत्रित करण्यासाठी आता कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला असून त्यानुसार त्यांनी आदेशित केले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी दिली.

लसीकरणाची जम्बो मोहीम प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे, त्यासोबतच चाचण्यांचीही मोहीम राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या रोज सरासरी चार ते पाच हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या दहा हजारापर्यंत नेण्याचे उद्दीष्ट प्रशासकांनी दिले आहे. त्या दृष्टीने नियोजन देखील केले जात आहे, असे डॉ. राठोडकर यांनी सांगितले.

चाचण्यांची जम्बो मोहीम राबवण्यासाठी पालिकेने अडिच लाख अँटिजेन किटस् खरेदी केल्या आहेत. पूर्वीच्या एक लाख किटस् अजून शिल्लक आहेत. त्यामुळे अँटिजेन किटस्ची संख्या साडेतीन लाख झाली आहे. यापैकी काही किटस् जिल्हा परिषदेला आणि काही किटस् जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिल्या जाणार आहेत. आरटीपीसीआर चाचणीच्या एक लाख किटस् पालिकेकडे आहेत. दोन्हीही प्रकारच्या किटची संख्या पुरेशी असल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण लगेचच वाढवणे शक्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!