Share

गाईड, रिक्त जागांच्या घोषणेनंतरच ‘पीएचडी’साठी नोंदणी

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘पीएचडी‘ साठी नोंदणी सुरू झालेली नाही. कार्यक्षेत्रातील संशोधक मार्गदर्शक व त्यांच्याकडे रिक्त असलेल्या जागांची यादी घोषित झाल्यानंतरच हा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने यंदा पेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ३० जानेवारीला पेटचा पहिला पेपर घेऊन एक फेब्रुवारीला निकाल घोषित केला. १३ मार्च रोजी ४५ विषयांसाठी पेटचा दुसरा पेपर ऑनलाईन पद्धतीने घेतला. शंभर गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. १७ मार्चला निकाल लागला. पेटच्या निकालानंतर दुसरा टप्पा सुरू होणार होता. तथापि व्यवस्थापन परिषदेच्या २४ मार्च रोजीच्या बैठकीत पीएचडी संशोधक मार्गदर्शक संदर्भात गठीत समितीचा अहवाल स्विकारण्यात आला.

त्यानुसार संशोधक मार्गदर्शक व रिक्त जागांची संख्या या संदर्भात डाटा गोळा करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. हा डाटा प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विषयनिहाय संशोधक मार्गदर्शक तसेच त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागा याची यादी घोषित करण्यात येणार आहे. त्यानंतरच पेटचा दुसरा टप्पा ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार आहे. या टप्प्यात पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम. फिल आदी) विद्यार्थ्यांची पीएचडीसाठी ऑनलाईन नोंदणी तर त्यानंतर संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले आणि ‘पेट‘ मधून सुट मिळालेले दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. याची यादी घोषित झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यानंतर विद्यापीठात हार्ड कॉपी  जमा करता येईल. त्यानंतर संशोधन व अधिमान्यता समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे. या विषयीची माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असल्याचे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!