औरंगाबाद : औरंगाबादकडे दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीला समोरून आलेल्या सुसाट ट्रकने चिरडल्यामुळे दोघांच्या मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना खोर्याचा वापर करावा लागला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी फाट्याजवळ घडली.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय पूनमचंद छनवाल (५१) आणि मीनाबाई संजय छनवाल (४६) (दोन्ही राहणार शांतीनगर, परसोडा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय हे सकाळी त्यांच्या (एम. एच. २० डी. एक्स. ३१७९) या क्रमांकाच्या दुचाकीवरून औरंगाबादेत कामानिमित्त येत होते.
दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असून बांधणी देखील अंतिम टप्प्यात आहे. त्या पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला अनेक फुट फरपटत नेले.
अपघातात दोघे ठार झाल्याचे समजताच ट्रक चालकाने घटनस्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती स्थनिकांनी पोलिसांना देताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी पथकासह घटनस्थळ गाठले. घटनास्थळावरील दृश्य पाहून सर्वच थक्क झाले. कारण अपघात एवढा भीषण होता की, पती-पत्नी दोघांचाही चेंदामेंदा झाला होता. दोघांच्या मृतदेहाचे अवयव एकमेकांत मिसळले गेले होते.
त्यामुळे कोणते अवयव कोणाचे हे देखील ओळखू येत नव्हते. पोलिसांना अक्षरशः मृतदेहाच्या मांसचा खच खोर्याने उचलावा लागला. तर संजय यांचे शीर पोलिसांना आढळून आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात हलविले असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ घटनेची अतिरीक्त जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी होणार
- संसर्गाचे राजकारण रोखा ; मुख्यमंत्र्यांचे माध्यमांना आवाहन
- गाईड, रिक्त जागांच्या घोषणेनंतरच ‘पीएचडी’साठी नोंदणी
- कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी पालिकेने वाढवली चाचण्यांची संख्या
- सचिन वाझेंना आता ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

