मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली आणि त्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. शेतकऱ्यांच्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले. मात्र अजूनही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी स्पष्ट केलं आहे. कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार असल्याची खंत व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या व्यक्तव्यवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्याच सोबत संजय राऊत यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना मालक नव्हे तर गुलाम करण्याचा हा कायदा होता, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- आरबीआयचा मोठा निर्णय; ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी करणार ‘हे’ उपाय
- ‘मी आता अर्धा भारतीय आहे ‘, एबी डिव्हिलियर्सने RCB सोबत शेअर केला भावूक व्हिडिओ
- तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; प्रकृती खालावल्याने समर्थकांचा उद्रेक
- सतत टीका करणाऱ्या नवाब मलिकांनी केले फडणवीसांच्या ‘या’ गुणाचे कौतुक
- ‘ऐका हो ऐका…! मोदी येणार आहेत, बाल्कनीत कुणीही कपडे वाळत घालू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

