Share

‘मी आता अर्धा भारतीय आहे ‘, एबी डिव्हिलियर्सने RCB सोबत शेअर केला भावूक व्हिडिओ

Published On: 

जयपूर : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) ने अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिव्हिलियर्सने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतली होती पण त्याने लीग क्रिकेट खेळणे थांबवले नव्हते. मात्र, आता त्याने क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती जाहीर केली असून त्यामुळे तो यापुढे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार नाही.

दरम्यान, त्याने आरसीबीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने निवृत्तीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. या व्हिडिओमध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मी आज एक मोठी आणि भावनिक घोषणा करणार आहे. मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो. जेव्हा मी बंगळुरूकडून आयपीएल खेळलो किंवा इतर कोणत्याही आयपीएल संघासाठी खेळलो, तेव्हा त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

https://www.instagram.com/tv/CWcukA7FJyI/?utm_source=ig_web_copy_link

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी एबी डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मी आयुष्यभर आरसीबीयन राहणार आहे’. आरसीबीच्या सेटअपमध्ये प्रत्येकजण माझ्यासाठी कुटुंबाचा सदस्य झाला आहे. लोक येतात आणि जातात, पण आरसीबीची एकमेकांबद्दलची भावना आणि प्रेम नेहमीच राहील. मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला याचा अभिमान आहे.

एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये दिसला असून यादरम्यान त्याने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली परंतु 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामील झाल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला खरी ओळख मिळाली. डिव्हिलियर्सने विराट कोहलीसोबत मैदानावर नेहमीच उत्कृष्ट भागीदारी केली, जी संस्मरणीय ठरली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!