Share

तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; प्रकृती खालावल्याने समर्थकांचा उद्रेक

Published On: 

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असून आज(२० नोव्हें.) या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. परंतु, काल तुपकर यांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. तुपकरांची प्रकृती बघून आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आंदोलनाला पाठिंबा दिला,पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. फक्त एवढेच नाही तर यावेळी एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना रविकांत तुपकर यांच्या आई म्हणाल्या की, ‘माझा मुलगा शेतकऱ्यांसाठी लढतोय. शेवटी शेतकऱ्यांचा मुलगा आहे तो. गुंडगिरी नाही करत. आम्ही कोणता गुन्हा नाही केला. आम्ही स्वतः शेतकरी आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी त्यानं आंदोलन केलंय. तो त्याच्या मालाला तो भाव मागतो. सर्व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तो स्वतःचा जीव त्याग करण्यासाठीही तयार आहे. याची दखल सरकारनं घ्यायला पाहिजे. त्याच्या जीवाला काही बरंवाईट झालं तर त्याला फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार असेल.’

दरम्यान, मागील चार दिवसांपासून सुरु असलेलय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कापूस, सोयाबीन आंदोलनाला आता वाढता पाठिंबा बघायला मिळत आहे. तसेच तुपकरांची तब्येत ढासळत असल्याने कार्यकर्त्यांची आता चिंता वाढू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!