नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या २२ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून येथील पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात मोदींचा सुरक्षेचा भाग म्हणून स्थनिकांनी चार दिवस आपल्या बाल्कनी व खिडकीमध्ये कपडे वाळत घालू नये असे निर्देश दिले आहेत. हे पत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यावर संतापजनक प्रितिक्रिया उमटत आहेत.
Don’t dry your clothes on the balcony. Modiji is passing by. pic.twitter.com/x8NBEtgRN4
— Rohini Singh (@rohini_sgh) November 18, 2021
उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी लवकरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेश दौरे वाढले आहेत. पंतप्रधान मोदींनी नुकतेच उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली होती. आता पुन्हा येत्या २२ नोव्हेंबरला ते युपीत येणार आहेत.

लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. त्याअनुषंगाने गोमतीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी स्थानिक सर्व इमारतीमधील रहिवाशांना हे पत्र पाठवले आहे. त्यात खिडकी आणि बाल्कनीत कपडे वाळत घालू नका, कोणतीही गोष्ट लटकवून ठेऊ नका, आपल्या इमारतीमध्ये नवीन कुणी रहायला आल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, अशा सूचना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- ‘एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण याला ‘हा’ एकच पर्याय उपलब्ध’
- ‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’
- पेन्शन पासून वंचित पात्र स्वातंत्र्य सैनिकांना न्याय द्या; सामाजिक संघटनांचे ठाकरे सरकारला साकडे!
- कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

