Share

आरबीआयचा मोठा निर्णय; ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी करणार ‘हे’ उपाय

Published On: 

नवी दिल्ली : ऑनलाईन फसवणूकीमध्ये (Online Fraud)  वाढ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. वेळोवेळी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जाते. मात्र वाढत्या फसवणुकीच्या घटनेमुळे आरबीआयने (RBI) आता नवी नियमावली जाहीर केले आहेत.

ऑनलाईन पद्धतीने कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांबाबत आरबीयाने पुढाकार घेतला आहे. याबाबत मध्यवर्ती बँकेकडून एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी या समितीने अनेक उपाय सूचवले आहेत. ऑनलाईन कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांची यादी बनवण्यात यावी, अशा सर्व संस्थांची सत्यता पडताळण्यात यावी, संस्थेकडून पुरवण्यात येणाऱ्या ऑनलाईन कर्जाबाबत नवे नियम जाहीर करण्यात यावे.

तसेच नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, ऑनलाईन कर्ज व्यवाहार करताना ग्राहकांचा डेटा ग्राहकाच्या परवानगीशिवाय या संस्थेला स्टोअर करण्यास मनाई करावी, असे विविध उपाय या समितीच्या वतीने सूचवण्यात आले आहेत.

आरबीआयचे कार्यकारी निर्देशक जयंत कुमार दास (Jayant kumar das) यांच्या अध्यक्षतेखाली 13 जानेवारी 2021 ला मध्यवर्ती बँकेकडून समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने ऑनलाईन वित्त पुरवठादार संस्था आणि ग्राहकांचा अभ्यास करून विविध उपाययोजना सूचवल्या आहेत. यातील योग्य त्या उपाययोजनेवर तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!