Share

सतत टीका करणाऱ्या नवाब मलिकांनी केले फडणवीसांच्या ‘या’ गुणाचे कौतुक

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या सातत्याने चर्चेत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर सातत्याने पत्रकार परिषद घेऊन ते एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करत आहेत. केवळ समीर वानखेडे यांच्यावरच आरोप नाही तर विरोधी पक्षांवर देखील त्यांनी चांगलाच निशाणा ते वेळोवेळी साधत असतात.

भाजप पक्षाचे विरोधी पक्षेनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील अल्पसंख्यान मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. फडणवीस सत्तेत असताना यांच्याच आशीर्वादाने राज्यात ड्रग्सचं रॅकेट सुरू होतं, असा दावा देखील मलिकांनी केला होता. सतत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आरोप करणाऱ्या अल्पसंख्यान मंत्री नवाब मलिक यांनी मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले आहे.

एका कार्यक्रमात बोलत असताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील चांगला गुण कोणता, असा प्रश्न नवाब मलिक यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस लोकांशी चांगले संबंध ठेवतात. माणसांशी कनेक्ट होणं हा त्यांच्यातील चांगला गुण असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना नवाब मलिक यांनी त्यांच्या बद्दलच्या काही आठवणी देखील सांगितल्या. एकदा त्यांना डिनरला बोलावलं होतं त्यावेळी ते आले होते. ते लोकांसोबत उत्तमपणे नातं जपतात, असं देखील मलिक यावेळी म्हणाले. त्याच सोबत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिला आहे. फडणवीस लोकांशी संबंध व्यवस्थित ठेवतात. मात्र त्यांना लोकं नीट ओळखता येत नाहीत, त्यांनी लोकांना पारखणं देखील शिकलं पाहिजे, असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!