🕒 1 min read
तुळजापूर –घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ?द्राक्षबागा भुईसपाट झाल्या ,कांदाचा रेंदा झाला ,आता करायचं काय ! जमिनी खंगाळुन गेल्या जगायचे कसे? हे आणि असे कित्येक प्रश्न सध्या अतिवृष्टी झालेल्या भागातील नागरिकांच्या समोर आहेत. हे सर्व प्रश्न अतिवृष्टी बाधीत एका महिलेने खा.संभाजीराजेंच्या समोर उपस्थित केले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानची पाहणीसाठी संभाजी राजे आले असता महिला शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.
यावेळी संभाजी राजेनी थेट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावुन अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान पाहणी केली.
यात आपसिंगा येथे तर शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता तिथे दीड कीलोमीटर टँक्टर मधुन नंतर चिखलातुन शेतात जावून नुकसान पाहणी केली.
पाहणी नंतर बोलताना छञपती संभाजी राजे म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन यात छञपती संस्थानचा जमिनीनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. छञपतींना नुकसान भरपाई नको पण उर्वरीत शेतकऱ्यांच्या नुकसान चे तात्काळ पंचनामे करा असे सांगुन मदत बाबतीत मी केंद्राला बोलतो. गोरगरीब शेतकऱ्यांना माञ मदत गरजेची असल्याने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी मी शासनाकडे करणार असल्याचे छञपती संभाजी राजे यांनी तुळजापूर तलुक्यातील आपसिंगा काञी कामठा सिंदफळ तामलवाडी येथे अतिवृष्टी ने झालेल्या नुकसान ची पाहणी नंतर स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
- ८० वर्षांच्या योध्याने शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले,अश्रू पुसले आणि धीरही दिला
- सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनावेळी जयंत पाटील झाले भावूक;अश्रू झाले अनावर…
- आमच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळेच सरकारची जिम उघडण्याची तयारी -भाजयुमो
- ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे’
- दुचाकीवर मंत्री पोहोचले आदिवासी पाड्यावर केले हे महत्त्वाचे काम…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
