Share

दुचाकीवर मंत्री पोहोचले आदिवासी पाड्यावर केले हे महत्त्वाचे काम…

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:-  प्राजक्त तनपुरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती.

दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावरील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे थेट अरुंद रस्त्यावरून दुचाकीवर तेथे पोहोचले. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती, त्यामुळे हे उद्घाटन खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेल्याच्या भावनाही ना.तनपुरे यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, बोंबलदरा, अगदी कमी वस्ती असलेला माझ्या आदिवासी बांधवांचा हा पाडा. राहुरी-संगमनेर सीमेवर, दुरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती. आज मी स्वतः अरुंद वाटेवरून मोटरसायकलने प्रवास करत येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले.

मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटने केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्ख प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेला. सुख म्हणजे नक्की काय असतं, याचा प्रत्यय आज आला असे ना.तनपुरे म्हणाले.

मागील अनेक वर्षे राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावर वीज नसल्यामुळे तेथील नागरिकांच्या नशिबी कायमच अंधार असल्याचे चित्र होते. वीज नसल्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता येथे वीज पोहोचवण्यात राज्य सरकारला यश आले असून तेथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!