सांगली – आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील हे भावूक झालेच शिवाय त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात गेले होते. यावेळी जवळच्या लोकांचे अकाली निधन झाल्यामुळे जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना गहिवरूनही आले.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच लोकं आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.
कोरोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक जयंत पाटील यांनी या कालखंडात गमावले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ८० वर्षांच्या योध्याने शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले,अश्रू पुसले आणि धीरही दिला
- मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला भगिनींकरिता लोकल चालू होईल याची तमा नाही का?
- आमच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळेच सरकारची जिम उघडण्याची तयारी -भाजयुमो
- ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे’
- दुचाकीवर मंत्री पोहोचले आदिवासी पाड्यावर केले हे महत्त्वाचे काम…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

