लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेतजमीन, खरीप पिके आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यासंबंधी पंचनामे करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे, असे सांगून शासन अपादग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांनी काळजी करू नये, अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिलासा दिला आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी दुपार नंतर निलंगा तालुक्यातील तगरखेडा तसेच औराद शहाजनी येथे भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी हाताशी आलेली खरीप पिके, काढून ठेवलेले सोयाबीन पीक वाहून गेले, शेतात पाणी साठून इतर पिकांचीही नासाडी झाली, शेती अवजारे वाहून गेली, ऊस पीक भुईसपाट झाले आहे, शेताकडे जाणारे रस्ते वाहून गेले आहेत, यासंबंधीची माहिती पालकमंत्री देशमुख यांना दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये शासन त्यांच्यासोबत आहे अशा शब्दात पालकमंत्री देशमुख यांनी त्यांना दिलासा दिला.
पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील तगरखेडा गावातील गोपाळ रघुनाथ थेटे यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या ऊस, सोयाबीन पिकांची पाहणी केली.थेटे व जवळपासच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या अडचणी शासनाच्या वतीने तात्काळ सोडवण्यात येतील असे सांगून त्यांना धिर दिला.
बिराजदार कुटूंबियाचे सांत्वन
अतिवृष्टीच्या पावसात तगरखेडा येथील परमेश्वर नागनाथ बिराजदार यांची सोयाबीनची बनीम वाहून गेल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. बिराजदार कुटुंबाची भेट घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. या कुटूंबास शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
- पंजाबच्या विजयांनंतर ‘प्रीती झिंटा’ भलतीच ट्रोल
- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ‘अर्णब गोस्वामी’ची उच्च न्यायालयात धाव
- पंतप्रधानांकडून दखल; मात्र नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री फिरकेनात- राधाकृष्ण विखे
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
- नगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वाद शिगेला; काँग्रेसचे किरण काळे म्हणाले, संग्राम जगताप गुंड!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

