नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाच्या बलाढ्य लष्कासमोर युक्रेनचे लष्कर हे अतिशय कमकुवत आहे. तरी युक्रेन रशियाचा जमेल तसा सामना करत आहे.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की हे जगभरातून आपल्या देशाला कशी मदत मिळेल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच ” युरोपिअन युनिअन” मध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला होता. त्याला युरोपिअन युनिअनच्या संसदेने विनाविलंब युक्रेनला सामील करून घेण्यास परवानगी दिली आहे. युरोपिअन युनिअनचा युक्रेन सदस्य झाल्यास युक्रेनला राजकीय आणि आर्थिक पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. त्यातच आज युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपिअन युनिअनच्या संसदेत भाषण केले. व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या या भाषणाला उपस्थित सदस्यांनी उभे राहून प्रतिसाद दिला.
युरोपिअन युनिअनच्या संसदेत आज भाषण करताना युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले कि, ” आम्ही युक्रेरीअन आहोत. आमचा वारसाच लढ्याचा आहे. आमचा वारसाच संघर्षाचा आहे. आम्ही युक्रेनचे नागरिक म्हणून प्रचंड खंबीर आहोत. आम्ही बलवान आहोत. जगातील कोणतीही ताकद आम्हाला तोडू शकत नाही. आम्हला आमची पुढची पिढी शांततेत जगताना पाहायची आहे. त्यामुळे आम्ही आता संघर्ष करत आहोत आणि आम्ही प्रचंड उदात्त हेतू ठेवून संघर्ष करत आहोत त्यामुळे शेवटी यश आम्हालाच प्राप्त होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. या आवेशपूर्ण भाषणानंतर युरोपिअन युनिअनच्या संसदेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी उभे राहून युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची स्तुती केली.
महत्वाच्या बातम्या :
- अखेर पुण्यातील चिमुकलीला न्याय ; नराधमाला फाशीची शिक्षा
- “लवासाबाबद सत्तेचा दुरुपयोग, मी गप्प बसणार नाही”; किरीट सोमय्या आक्रमक!
- Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
- GST 2022 : जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली १८ टक्क्यांनी वाढ
- ‘दाऊदचा माणूस पवारांना चालतो’; निलेश राणेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

