🕒 1 min read
मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे.
तर काही जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे. भाजपसह अन्य विरोधी पक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटनांकडून या मागणीसाठी आंदोलनही करण्यात येत आहे. तर व्यापारी वर्गही राज्य सरकारकडे शिथिलता देण्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री जनतेशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state tonight at 8 pm
Stay tuned on our Facebook/Twitter/YouTube Channel for the LIVE streamhttps://t.co/2xokOekMo2https://t.co/MmWFoeK2bU pic.twitter.com/KfqpJGHr2g
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2021
दरम्यान आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक पार पडली आहे. आजच्या या बैठकीकडे पुणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आणि सामान्यांचे खास लागले होते. पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, इतर भाजप नेते यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली होती.
यावेळी पुण्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट सरासरीपेक्षा कमी आल्याने पुण्यात निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र पुणे ग्रामीणमध्ये निर्बंधात शिथिलता देण्यात आली नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पुढील आठवड्यात पुणे ग्रामीणबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच पुणे ग्रामीणला लेव्हल 3चे निर्बंध लागू राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो’; मुख्यमंत्री ठाकरेंचा नीरजच्या कुटुंबियांना फोन
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- मराठा क्रांती मोर्चाची पाच वर्षे; छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत साजरा होणार वर्धापनदिन!
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
