Share

‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो’; मुख्यमंत्री ठाकरेंचा नीरजच्या कुटुंबियांना फोन

Published On: 

मुंबई : भालाफेकपटू नीरज चोप्राने अपेक्षेप्रमाणे टोकियो ऑलिम्पिकचा समारोप भारतासाठी सोनेरी यशाने केला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

नीरजचे पूर्वज हे महाराष्ट्रीय असल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. पानिपतच्या उद्भवली त्याचे वंशज हे फौजेत सामील झाले होते. यानंतर जे मराठा योद्धे बचावले त्यांनी याच पानिपतच्या आसपासच्या गावात बस्तान बसवले. यातील एक हे नीरजचे पूर्वज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांना फोन करून शुभेच्छा देत त्याचे भरभरून कौतुक केलं आहे.

‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी ठाकरे यांनी काढत त्याचा महाराष्ट्र सरकार तर्फे सत्कार करण्याची इच्छा व्यक्त करत त्याला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण देखील ठाकरे यांनी दिल्याचे समजत आहे. ‘नीरज चोप्रा हा १३ ऑगस्टला आपल्या हरयाणातील खांदरा या गावात येणार आहे. यावेळी नीरजचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर नीरज १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सत्कार करु इच्छित आहे,’ असे ठाकरे यांनी सांगितल्याचे नीरजच्या कुटुंबीयांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!