Share

मोशीत सेन्टॉस्सा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर साकारणार सफारी पार्क; पर्यटनमंत्र्यांची मान्यता

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी:- मोशी येथील आरक्षित जागी सेन्टॉस्सा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्यात येणार आहे. त्याला राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. या पार्कसाठी सुमारे १५०० ते १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तातडीने एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिका उभारणार आहे. तीन वर्षात सफारी पार्क साकारणार असून पिंपरी महापालिका आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येईल. याबाबतची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मोशीत सफारी पार्क करण्याबाबत मुबंईत बैठक आयोजित करण्यात आली होती. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) बैठक झाली. या बैठकीत सफारी पार्क साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार महेश लांडगे, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राम पवार यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकरी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी पर्यटनमंत्री रावल म्हणाले, मोशीतील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सेन्टॉस्सा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क साकारण्यात यावा. त्यासाठी तातडीने एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात यावा. या पार्कसाठी पर्यटन विभाग निधीची कमतरता भासू देणार नाही.

त्यासोबतच ते म्हणाले सफारी पार्कचा  सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करावा. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सफारी पार्क साकारण्याचे हाम हाती घेण्याचे निर्देश पर्यटनमंत्री रावल यांनी संबंधित अधिका-यांना बैठकीत दिले. सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क’ साकारण्यात यावा. सफारी पार्क उत्तम प्रेक्षणीय स्थळ होईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी ही आनंदाची बाब आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित होणार असल्याने समाविष्ट गावाच्या विकासांना आणखीन चालना मिळणार आहे. सिंगापूरमधील सेन्टॉस्सा पार्कच्या धर्तीवर हा सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठी विदेशी कंपन्या एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून तीन वर्षात सफारी पार्क साकारणार आहे.

महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पिंपरी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्क साकारण्यात येईल. सफारी पार्क साकरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मान्यता दिल्याबाबद्दल मोशीकरांच्या वतीने त्यांचे मी आभार त्यांचे आभार मानतो.

समाविष्ट गावांना मिळणार पर्यटन संजिवनी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, च-होलीचा भाग वेगाने विकसित होत आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प याठिकाणी हाती घेतले आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांच्या पायाभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. चिखली, मोशी, च-होली आदी भागांतील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग-व्यावसायाची वृद्धी होणार आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. यासह बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संजिवनी देण्याचे ‘व्हीजन’ आमदार महेश लांडगे यांनी ठेवले आहे.

मोशीकरांना बाप्पा पावला

मोशी येथील नियोजित सफारी पार्कच्या जागी पुणे महापालिकेचा कचरा डेपो करण्याचा घाट घातला होता. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कचरा डेपोला जागा देण्याचा डाव हाणून पाडला. याजागी आतंरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यास पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे मोशीकरांची पुण्याच्या होणा-या कच-यापासून सुटका झाली आहे.

पिंपरी महापालिकेचा कचरा डेपो मोशीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना होती. परंतु, आमदार महेश लांडगे यांनी मोशीकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. मोशीत सिंगापूरमधील सेन्टॉस्सा पार्कच्या धर्तीवर सफारी पार्क साकारले जाणार आहे. त्यामुळे मोशीकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मोशीकरांना बाप्पा पावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!