Share

भाजपचा शिवसेनेला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याचा फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश

Published On: 

चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आल्यानंतर महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार असल्याने राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याची चिन्हे देखील वेग घेऊ लागले आहेत.

खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी सक्रिय होत आहेत. तर, भाजपचा झेंडा महापालिकेवर पुन्हा एकदा फडकवण्याचा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे हे रणनीती आखत आहेत. आता भाजपने शिवसेनेचा वचपा काढण्यासह महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये धोबीपछाड करण्यासाठी लक्ष्मण जगताप यांची ही यशस्वी खेळी असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!