पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल आता शहरात लागली आहे. २०२२ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक होणे अपेक्षित असून आता राजकीय क्षेत्रातील हालचाल वाढली आहे. २०१४ नंतरच्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अन् अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला. २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली.
यामुळे एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. त्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली तरी राज्यातील सरकारमध्ये झालेला बदल आणि एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट, इनकमिंग झालेल्या नगरसेवकांची घरवापसी यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडं, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा हाती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार हे खास लक्ष घालणार असल्याचं समजत आहे. ताशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत.
मात्र, अजित पवारांना चितपट करू असा विश्वास भाजप नेते आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. ‘पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आल्यानंतर येथे भरपूर विकासकामे झाली आहेत. अजित पवार यांच्या हाती कारभाराची सूत्रे होती त्यापेक्षाही आम्ही जास्त कामे करू शकलो. म्हणूनच आम्हाला पुन्हा विजयाचा विश्वास आहे’ असं ते म्हणाले.
यासोबतच, ‘एक सदस्यीय असो दोन की चार सदस्यीय वाॅर्ड पद्धत असो. त्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही. एक सदस्यीयमध्ये महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडाळी होणारच आहे. वरिष्ठ नेते सत्तेसाठी एकत्र आले म्हणजे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर एकत्र येतात, असे नाही. त्यामुळे भाजपची कोणत्याही सदस्यीय पद्धतीत तयारी आहे. त्याची आम्हाला भीती वाटत नाही,’ असं भाष्य देखील लक्ष्मण जगताप यांनी करतानाच ही लढाई अजित पवार विरुद्ध जगताप किंवा महेश लांडगे अशी नाही. ही लढाई भाजप विरुद्ध अजित पवार असल्याचं देखील अधोरेखित केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांना कुठेही पेरलं तरी घोटाळाच उगवतो, बारामती ऍग्रोमुळे हे सिद्ध झालं – पडळकर
- अखेर ठरलंच ! विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं महत्वाचं विधान
- गोपीनाथ मुंडे असते तर अशा पद्धतीने ओबीसींचे आरक्षण रद्द होऊच दिले नसते
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर ‘हा’ कसा असेल’; खडसेंचा सवाल
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर


