🕒 1 min read
भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल आता शहरात लागली आहे. २०२२ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक होणे अपेक्षित असून आता राजकीय क्षेत्रातील हालचाल वाढली आहे. २०१४ नंतरच्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अन् अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला. २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली.
यामुळे एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. त्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली तरी राज्यातील सरकारमध्ये झालेला बदल आणि एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट, इनकमिंग झालेल्या नगरसेवकांची घरवापसी यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अनेक कार्यकर्त्यांनी लांडेवाडी, ता. आंबेगाव येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना जबर धक्का मानला जात आहे. शैलेश उर्फ तुकाराम निवृत्ती मोरे, सुनील भागुजी बाटे, श्रीकांत चनाप्पा करोली, बाबासाहेब गोविंद काळोखे, संदीप राघु चव्हाण, बटु काशिनाथ पाटील, किशोर अशोक शिनगारे, अशोक अश्रुभा चव्हाण, भारत एकनाथ नरवडे, संजय कृष्णा पाटील आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले व भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी यासाठी पुढाकार घेतला. या सर्वजणांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून पक्षसंघटनेचे काम वेगाने करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदारांच्या नियुक्त्यांसाठी मोदींकडे मागणी; मग राज्य सेवेच्या रखडलेल्या नियुक्त्यांचं काय ? वडेट्टीवार म्हणतात…
- ‘काही तरी लाज शिल्लक असू द्या रे’; निलेश राणेंची राऊतांसह शिवसेनेवर जहरी टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- कोरोना नियमांचे उल्लघंन,पोलिसांना धक्काबुक्की ; भाई जगतापांवर गुन्हा दाखल
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
