पिंपरी चिंचवड : देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून राज्यात आणि त्यातही पुणे जिल्ह्यात असणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने प्रशासनाची देखील चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. यामुळेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रयत्न करत आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना नियम पाळावे म्हणून सक्ती केली जात असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येत आहेत. सध्या भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ते कोरोना नियमांची पूर्णपणे पायमल्ली करत असल्याचे समोर येत आहे.
मुलीच्या लग्न समारंभातील मांडव टहाळ्याचा कार्यक्रमात महेश लांडगे आणि त्याच्या समर्थकांनी हळद उधळत भंडाऱ्यात नाहून डान्स केला आहे. यावेळी आमदारा महेश लांडगे यांना खांद्यावर घेऊन वाजंत्रीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी एकच ठेका धरला होता. तर, आजूबाजूला भंडाऱ्याची उधळण होत होती. काही सेकंदाच्या डान्स मोबाईलमध्ये टिपण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
हा डान्स सध्या महेश लांडगेंना चांगलाच महागात पडलेला दिसत आहे कारण आता या प्रकरणी आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील पहिल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’चे अजित पवारांच्या हस्ते उदघाटन
- पुणेकरांना मोठा दिलासा; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून खाली ! लवकरच ‘हे’ नियम लागू होणार
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- ‘दिल्लीत गेल्यावर मोदींना ‘तेवढं’ नक्की सांगा’, अजितदादांचे आठवलेंना साकडे
- अनलॉकला सुरुवात : ‘या’ जिल्ह्यात सलून, कपड्याचे दुकान, सराफ दुकानं उद्यापासून सुरू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
