मुंबई : शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टी तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
पुनीत राजकुमार यांचे निधन होऊन आता आठवड्यापेक्षाही अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र त्यांचे लाखो चाहते त्यांच्या निधनाच्या दुःखातून अद्यापही सावरलेले नाहीत.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिथे दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो चाहते रांगेत उभे होते.
येथे पोहोचल्यानंतर भावूक लोकांनी पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली आणि आपली व्यथा मांडली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
A sea of people !
Large number of people gathered at Palace grounds where Actor #PuneethRajukumar 's family organised Anna Santharpane today .
Video by @ashishhpendse @NewIndianXpress @santwana99 pic.twitter.com/GDNTUSrfG0
— TNIE Karnataka (@XpressBengaluru) November 9, 2021
पुनीत राजकुमार, कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.
तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीत आले. त्याने आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- देशाला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाजाच्या वापराची शक्यता- अजित डोभाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

