Share

‘एकट्या बीड जिल्ह्यात दोनशेहून अधिक शेतकरी आत्महत्या, यांना मात्र आर्यनला वाचविण्यात रस’, विनायक मेटेंची टीका

Published On: 

पुणे : बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एका जिल्ह्यात इतकी संख्या असेल तर राज्यात किती?, मात्र राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही. केवळ आर्यन खानला वाचविण्यातच त्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. ते पुण्यात बोलत होते.

पुढे बोलताना मेटे म्हणाले, राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामेदेखील यांनी गांभीर्याने केले नाहीत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत देऊन हे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी काळी करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या वतीने पहिला शेतकरी मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही मेटेंनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणा बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकलपणा करत आहे. न्यायालयीन बाबतीत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे, जिल्हावार वसतीगृह तसेच सारथी संस्थेतून देखील न्याय देऊ शकलेले नाही, असेही मेटेंनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!