नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने आता त्यांचं आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.
दिल्लीत मंगळवारी ३५ शेतकरी संघटनांची सरकारबरोबर ३ तास बैठक चालली. पण ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश उपस्थित होते. या बैठकीत सरकारने कायद्यांच्या माहिती देत शेतकऱ्यांचे फायदे सांगितले. पण शेतकरी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, आज पुन्हा शेतकरी संघटनांचे प्रनिनिधी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी बातचित करणार आहेत. याआधी मंगळवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. परंतु, ही बैठक निष्फळ ठरली होती.आतापर्यंत शेतकरी आंदोलनाला १०० हून जास्त संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला अनेक इतर क्षेत्रांतील संघटनांचाही समावेश आहे. आंदोलनस्थळी अशा संघटनांचे पदाधिकारी व इतर लोकांची गर्दीही वाढली आहे. त्यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नाही. हे लोक या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्येही करतात. त्यावर शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
महत्वाच्या बातम्या
-
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
-
व्याजदर निर्णयासाठी आरबीआयची बैठक सुरू; विकास दर अंदाजात सुधारणा?
-
पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत
-
‘या दोन तोंडी मांडगुळांची तेव्हा कुठे गेलेली मराठी अस्मिता?’
-
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
