Share

संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसीय आपत्कालीन अधिवेशन बोलाविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

खासदार मनीष तिवारी यांनी ट्विटरवर सांगितले की, देशभरातील रुग्णालयांत बेड शिल्लक नाहीत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. लसीकरणदेखील व्यवस्थित पद्धतीने होत नाही. परिस्थिती इतकी भीषण आहे की, स्मशानातदेखील जागा उरली नाही.

त्यामुळे राष्ट्रपतींनी आपल्या अधिकाराचा वापर करत तातडीने संसदेचे दोनदिवसीय आपत्कालीन अधिवेशन बोलावले पाहिजे. अधिवेशनात एकंदर स्थितीवर चर्चा करत व्यापक धोरण तयार करता येईल, असे तिवारी म्हणाले. हे पाऊल तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे. अन्यथा स्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेचे काँग्रेसला समर्थन
देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून संसेदचे किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचे वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचे किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!