Share

Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. गोलंदाजा विरुद्ध धावा काढण्यात तो झुंजताना दिसत आहे. अनेक क्रिकेट चाहतेही विराटच्या मोठ्या खेळीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोहलीने २०१९ च्या कोलकाता कसोटीत बांगलादेशविरुद्ध शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला ३ वर्षांच्या काळात एकही शतक झळकावता आलेले नाही. विराटला स्वतःलाही त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी आतुरता असेल. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात सर्वांनाच विराट कडून मोठी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही आणि सामन्याच्या दोन्ही डावात ११ आणि २० धावा करून तो बाद झाला. या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि इंग्लंड विरुध्दची पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली.

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटची सरासरी सध्या ४९.५३ अशी आहे. मात्र गेल्या एका वर्षात त्याची कसोटी सरासरी ३० च्या खाली राहिली आहे. गेल्या एका वर्षात विराट कोहलीने १० कसोटी सामने खेळले असून १८ डावात २९.२७ च्या सरासरीने ५२७ धावा केल्या आहेत. या १० कसोटी सामन्यांपैकी त्याने ३ मायदेशात आणि ७ परदेशात खेळले आहेत. विराट कोहलीने आपली फलंदाजी सुधारण्यासाठी संघाचे कर्णधारपद सोडले. पण त्यामुळे त्याच्या खेळात विशेष फरक पडू शकला नाही. कोहलीच्या खराब फॉर्मबाबत इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर म्हणाले की, विराटने त्याच्या खराब कामगिरीबाबत सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांच्याशी चर्चा करायला पाहिजे.

एका इंग्रजी साइटशी बोलताना मॉन्टी पानेसर म्हणाले की, ‘मुख्य अडचण ही आहे की विराट कोहली जगातील सर्वाधिक विकला जाणारा क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकरनंतर या स्थानावर पोहोचणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून, नक्कीच प्रत्येकाला फक्त विराट कोहलीची फलंदाजी पाहायची आहे. त्याला मैदानावर खेळताना पाहायचे आहे. चाहते विराटवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम करतात. विराट कोहली आणि त्याची खेळातील आक्रमकता आपल्या सर्वांना आवडते. तो काही वेळा त्याच्या मार्गाबाहेर जातो, परंतु इंग्लंडमध्ये त्याचे खूप कौतुक केले जाते. त्यामुळे बीसीसीआयला विराटबाबत विचार करुन निर्णय घ्यावा लागेल. विराट कोहली जेव्हा खेळतो तेव्हा स्टेडियम प्रायोजकांनी भरलेले असते.

माँटी पानेसर म्हणाले की, विराट सध्या भारतासाठी योग्य आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे की, बीसीसीआयला बसून निवडकर्त्यांसोबत काम करणे आवश्यक आहे. जेव्हा टी-२० विश्वचषक किंवा एकदिवसीय विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धांचा विचार केला जातो. तेव्हा प्रायोजकत्वाच्या दृष्टिकोनातून ते अधिक पैसे कमवतात. पण याचा अर्थ त्याच्या खर्चावर टी-२० विश्वचषक किंवा ५० षटकांचा विश्वचषक जिंकणे नव्हे का? हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंसाठी हे खूप कठीण जाणार आहे. असेही तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!