मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या सहकार्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवीन सत्ता असल्याने शिंदे-फडणवीस सावलीसारखे एकमेकांसोबत असल्याचे दिसून येते. मात्र आतापर्यंतच्या अनेक पत्रकार परिषदेत शिंदेंअगोदर फडणवीसच अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर फडणवीसांचे नियंत्रण आहे काय?, अशा चर्चांना उधान येत आहे.
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद चालू असताना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला सुरू केलं तेवढ्यात फडणवीसांनी थेट त्यांच्या समोरचा माईकच काढून घेतला आणि त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानात काहीतरी कुजबुज करताना दिसून आले. याचाही व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
देवेंद्र फडणवीस “एमएमआरडीएचा विषय राहिला” अशी कुजबूज करताना दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियंत्रणात असल्याची टीकाही आता करण्यात येत आहे.
उप-मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद https://t.co/Fm9dwc4MZu
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 16, 2022
नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय-
दरम्यान ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र शिंदे सरकारने हे निर्णय स्थिगित केले होते. दरम्यान औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath shinde | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
- Srilanka Crisis : श्रीलंकेत पेट्रोलसाठी ‘हा’ स्टार क्रिकेटपटूही राहिला २ दिवस रांगेत उभा; म्हणाला…
- Shivsena and bjp : शाहाजी बापू पाटील यांचा कानमंत्र! सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हसून-हसून लोटपोट
- Gopichand Padalkar | “शरद पवार कधी घरात बसतात आणि मी…” ; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

