🕒 1 min read
सांगली : सांगलीतील वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर आक्रमक शब्दात टीका केली आहे. “20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर सेना आमदार सुरतला गेल्याची बातमी आली. त्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा कसा झाला होता. सत्ता गेल्याच सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”, असा टोला त्यांनी यावेळी जयंत पाटलांना लगावला आहे.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “सत्ता असेल तरच जयंत पाटील काम करु शकतात. ते सत्तेच्या विरोधात काम करु शकत नाही. त्यामुळेच शरद पवार कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी भावना जयंत पाटलांची झाली आहे. आमची भावना तशी नाही कारण आम्ही सामान्य लोकांमधून आलो आहोत आणि त्यांच्यासाठीच काम करत आहोत. त्यामूळेच भाजपच्या एकाही आमदाराची इच्छा झाली नाही कि आमचा पक्ष सोडून सत्ताधारी पक्षाबरोबर जावं” त्याचबरोबर जयंत पाटील यांच्यासह त्यांचा भाचा सोडला तर एकही व्यक्ती त्यांच्याबरोबर नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या:
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियंत्रणात?; शिंदेंच्या कानात कुजबुज करतानाचा VIDEO व्हायरल
- Eknath Shinde | संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर! म्हणाले, “रोज सकाळी उठून…”
- T20 World Cup : १५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच भारताचं लक्ष्य; ‘असे’ आहेत भारताचे सामने
- Eknath shinde | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
- Srilanka Crisis : श्रीलंकेत पेट्रोलसाठी ‘हा’ स्टार क्रिकेटपटूही राहिला २ दिवस रांगेत उभा; म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
