मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन आता बराच काळ उलटला आहे. तरीही अजून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे सर्वसामान्यांची अनेक महत्त्वाची कामे रखडले आहेत. सध्या राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, तर कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व जनावरांचे नुकसान झाले आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सर्वसामान्यांचे हाल होत असताना मात्र हे सरकार हातावर हात धरून बसले आहे. अतिवृष्टी तसेच पूरग्रस्त भागातील पीडितांना तात्काळ मदत केली पाहिजे, मात्र हे सरकार संवेदनशील राहिलेले नाही. सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले तरी अजूनही हे जेवणावळीत आणि फाईव्हस्टार हॉटेलमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे यांना सर्वसामान्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
जिल्ह्याबाबत समस्येची तसेच उपाय योजनेची माहिती ठेवणारे पालकमंत्रीच सध्या जिल्ह्यांना नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणारे कोणीच उरलेले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या जनतेच्या प्रश्नाचे काहीही देणेघेणे नाही. अशी टीकाही यावेळी एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली.
सध्या राज्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच पूर्ण राज्य चालवत आहेत. दोघांच्याच भरोशावर पूर्ण राज्याचा कारभार सुरू आहे. अजूनही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. असे खडसे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर केला आहे. तरीही नव्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मुद्द्याला वरती काढून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशी टीकाही यावेळी एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली.
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक – गोपीचंद पडळकर
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियंत्रणात?; शिंदेंच्या कानात कुजबुज करतानाचा VIDEO व्हायरल
- Eknath Shinde | संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर! म्हणाले, “रोज सकाळी उठून…”
- T20 World Cup : १५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच भारताचं लक्ष्य; ‘असे’ आहेत भारताचे सामने
- Eknath shinde | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती


