Share

‘मनी लॉन्ड्रिंग करणारा सॅम डिसूझा एनसीबीच्या कार्यालयात’, राऊतांची सीबीआय चौकशीची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी काल(२४ ऑक्टो.)धक्कादायक खुलासे केले. प्रभाकरने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच यावेळी त्याने सॅम या व्यक्तीचे नाव घेतले होते. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

यासंदर्भात बोलतांना राऊत म्हणाले की,’भाजपाचे नेते जे ईडीचा खेळ करत आहे ना त्यांनी या प्रकरणातसुद्धा मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. मी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाजूला बसलेली आहे ती सॅम डिसूझा आहे. तो मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सर्वात मोठा खेळाडू आहे. तो मोठे राजकारणी, नेते, अधिकारी सर्वाचे मनी लॉन्ड्रिंग करतो असे म्हटले जातो. तो तिथे का बसला आहे? हा मोठा खेळ आहे.’

तसेच पुढे ते म्हणाले की,’जो साक्षीदार आहे त्याला काहीही होऊ देणार नाही. याप्रकरणाची संबंध फक्त मुंबईतच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. प्रभाकर साईलने खुलासे करुन देशावर मोठे उपकार केले आहेत. जे देशभक्तीच्या नावाखाली याप्रकारचे काम करतात त्यांना उघड करण्याचे काम त्याने केले आहे. आतापर्यंत नवाब मलिक यांनी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. मध्यातरानंतर मी खुलासे करणार आहे.’

दरम्यान, ‘याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अजून १० व्हिडीओ तुम्हाला मिळतील. भाजपाचे किती लोक या प्रकरणामध्ये आहेत हे तुम्हाला कळेल. किरण गोसावी कुठे आहे भाजपाला माहिती असेल. महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी या लोकांनी सोडलेली नाही. एनसीबीच्या कार्यालमध्ये बसलेल्या सॅम डिसूझाचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात येते. माझी मागणी आहे याची चौकशी करावी,’ असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!