🕒 1 min read
मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानुने रौप्य पदक पटकावत भारताला पहिले पदक पटकावून दिले. यानंतर रविवारी देखील भारताच्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. मात्र सोमवारचा दिवस हा निराशेचा ठरला.
सोमवारी झालेल्या विविध स्पर्धेत भारतीय खेळाडुंना पराभवाना सामोरे जावे लागले. रविवारी झुंझार पुनरागमन करत सामना जिंकणाऱ्या मनिका बत्राला सोमवारी ऑस्ट्रियाच्या सोफीया पोल्कानोवाने ११-८ ,११-२, ११-५ , ११-७ अशा चार सेट मध्ये पराभूत केलं. तर तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाच्या प्रवीण जाधव ,अतनू दास आणि तरुणदीप राय खेळांडूना उपांत्यपुर्व फेरीत दक्षिण कोरीयाच्या संघाकडून पराभव स्विकारावा लागला.
तर पहिली फेरी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या टेनीसपटु सुमित नागपालला दुसऱ्या फेरीत जागतीक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा रशियाचा खेळाडू डॅनियल मेदवदेवने ६-२, ६-१ च्या फरकाने हरवले. महिला टेनिस दुहेरी मध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा इंडोनेशियाच्या अव्वल क्रमांकाच्या गिडियोन फर्नाल्डी आणि केविन संजया सुकामुल्जो या जोडीने २१-१३, २१-१२ असा पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये शिल्पाच्या जागी दिसणार रितेश-जेनेलिया
- सोनू सूदने केला ढाबा सुरु; पाहायला मिळाला चपाती तयार करताना
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
