औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतीमध्ये अनधिकृतपणे वराहपालन सुरु आहे. मात्र यामुळे औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत आपला मुक्काम शहराबाहेर हलवण्याची सूचना केली आहे. या मुदतीत वराहांचा मुक्काम न हलवल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.
शहरात गेली अनेक वर्षे मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे. मात्र आता कुत्र्यांबरोबरच वराहांचाही त्रास वाढतच आहे. अनेक वसाहतीमध्ये वराह पालन करणाऱ्यांकडून वराह नाल्यात सोडले जातात. मात्र यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तसेच दुर्गंधी व डासांचा त्रासही वाढत आहे. याविरोधात मनपाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर मनपाला जाग आली. त्यामुळे मनपाने आता वराहपालन करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत वराहांना शहराबाहेर हलवण्याची सूचना केली आहे. या कालावधीत त्यांना मनपा हद्दीबाहेर न काढल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील जवळपास सर्वच भागात वराह पालन सुरु आहे. यात नारळी बाग, औरंगपुऱ्यातील नाला, मध्यवर्ती बसस्थानक, फाजलपुरा, बेगमपुरा , उस्मानपुरा, एकनाथ नगर याठिकाणी मोकाट वराहांचा सुळसुळाट आहे. शहरात एकूण १० हजार वराह असल्याचा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलन : पंतप्रधान मोदींची संसदेत उच्चस्तरीय बैठक सुरु
- माझ्या मुलांना धनंजय यांनी लपवून ठेवले, करुणा मुंडेंच्या तक्रारीने खळबळ
- शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- धनंजय मुंडेंविरुद्ध करुणा शर्मांचा एल्गार; पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण !
- कॉलेज होणार सुरु, आता विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन ? उदय सामंत म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
